शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:55 IST

आधुनिक युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहेत. मोबाईल आपल्या कामासाठी आणि संपर्कासाठी खूप उपयुक्त असला तरी, कधीकधी ...

आधुनिक युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहेत. मोबाईल आपल्या कामासाठी आणि संपर्कासाठी खूप उपयुक्त असला तरी, कधीकधी तो जीवघेणाही ठरू शकतो. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ज्यात मोबाईल स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने मोबाईल सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काय घडले बिलिया गावात?

पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बिलिया गावात देवेंद्र पटेल नावाचा तरुण आपल्या मोपेडवर बसून व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्याचवेळी अचानक त्याच्या मोबाईलचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की, देवेंद्र गंभीर जखमी झाला. त्याच्या मोपेडजवळ पेट्रोलचा कॅन असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. मोबाईल स्फोटामुळे लागलेली आग पेट्रोलमुळे भडकली आणि देवेंद्रला त्यात जीव गमवावा लागला.

आग इतकी भीषण होती की, देवेंद्रचे हात-पाय आणि शरीराचा मोठा भाग भाजला. ही घटना पाहून स्थानिक लोकही गोंधळले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

यापूर्वीही घडली होती अशी घटना

मोबाईल स्फोटाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्हा रुग्णालयातही अशीच एक घटना घडली होती. तिथे उपचारासाठी आलेल्या एका तरुणाच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला होता. यात तो तरुण गंभीर जखमी झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातGujaratगुजरातMobileमोबाइलBlastस्फोट