बलात्कारांच्या घटनांना मोबाइल फोन जबाबदार - आझम खान
By Admin | Updated: October 23, 2015 19:51 IST2015-10-23T19:51:13+5:302015-10-23T19:51:13+5:30
देशात होणा-या बलात्कारांच्या घटनांना मोबाइल फोन जबाबदार असल्याचे वादग्रस्त विधान करुन उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान चर्चेत आले आहेत.

बलात्कारांच्या घटनांना मोबाइल फोन जबाबदार - आझम खान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२३ - देशात होणा-या बलात्कारांच्या घटनांना मोबाइल फोन जबाबदार असल्याचे वादग्रस्त विधान करुन उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान चर्चेत आले आहेत.
दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी खान यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या पॉर्नोग्राफिक साहित्यामुळेच काही जण लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे मोबाईल फोनच चिमुरड्यांवरील बलात्कारांना जबाबदार आहेत.
आज अडिच वर्षाच्या मुलीवर बलात्कार का होतो ? याचे एकमेव कारण मोबाइल आहे. यामध्ये विनामुल्य अश्लिलता पाहायला मिळत आहे. अल्पवयीन मुलेही अश्लिल बाबी डाऊनलोड करून पाहतात. त्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत असल्याचे खान यांनी म्हटले आहे.