शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कॉलगर्लच्या नावे फेसबूकवर पोस्ट केला सासूचा मोबाइल नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 17:22 IST

पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केलं. इतकंच नाही तर त्याने प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही शेअर करुन टाकला.

ठळक मुद्देपत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही केला शेअरपोलिसांचा तक्रार दाखल करुन घेण्यास नकार

गाजियाबाद - पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केलं. इतकंच नाही तर त्याने प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही शेअर करुन टाकला.  आरोपी पतीने फेसबुकवर आपल्या पत्नीचा कॉलगर्ल म्हणून उल्लेख करत सोबत सासूचा मोबाइल क्रमांक देऊन टाकला. यानंतर महिलेला रोज फोन येऊन लागले. सुरुवातीला हे काय चालू आहे हे त्यांना समजलंच नाही. पण नंतर जेव्हा प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला यासंबंधी माहिती दिली. 

पीडित महिलेच्या मुलाने फोन करणा-या व्यक्तींना जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपल्याला हा फोन नंबर फेसबुकवरुन मिळाल्याची माहिती दिली. मंगळवारी पीडित महिला आपल्या मुलीसोबत सिहानी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल करुन न घेता, आम्हाला सायबर सेलकडे पाठवून दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

पीडित महिलेच्या मुलीचा पतीवर आरोप -वयस्कर महिलेच्या मुलीने सांगितलं आहे की, 'एक वर्षापुर्वी माझं लग्न नोएडामधील कंपनीत काम करणा-या एका तरुणाशी झालं होतं. लग्नानंतर तो हुंड्याची मागणी करत त्रास देऊ लागला होता. दरदिवशी तो काहीतरी मागणी करायचा. आपली मागणी पुर्ण झाली नाही की, मारहाण करायलाही पुढे मागे पहायचा नाही. त्याच्या त्रासाला कंटाळूनच आपण घर सोडून दिलं होतं'. मला त्रास देण्यासाठीच माझ्या पतीने आईचा फोन क्रमांक फेसबुकवर टाकला असल्याचा आरोप मुलीने केला आहे. 

पोलिसांचा तक्रार दाखल करुन घेण्यास नकार - यासंबंधी पीडित महिला तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली असता पोलिसांनी सायबर क्राइम विभागाकडे पाठवत तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. सिहानी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी विनोद पांडे यांना विचारलं असता आपल्याला काही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण जर तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला असेल तर ते चुकीचं आहे असंही ते बोलेले आहेत. 

टॅग्स :Facebookफेसबुक