शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

रस्ते बांधणीवर मोबाइल अ‍ॅपची नजर, काम झाल्यानंतर अ‍ॅपवर द्यावे लागतील अपडेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 4:06 AM

रस्त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी मोबाइल फोनने त्यावर देखरेख ठेवली जाईल.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी मोबाइल फोनने त्यावर देखरेख ठेवली जाईल. त्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.अधिका-यांना दौरा केल्यानंतर कामाची माहिती त्यात नोंदवावी लागेल. सामान्य लोकही लवकरच राष्ट्रीय महामार्गांच्या अवस्थेवरून दर्जा (रेटिंग) देऊ शकतील. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाअंतर्गत काम करीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक मिश्रा म्हणाले की, रस्त्यांच्या कामांच्या आढाव्यासाठी जाण्याआधी, आपण कोणत्या प्रकल्पाचा दौरा करीत आहोत, हे कळविण्याचे बंधन अधिका-यांवर असेल. नंतर प्रकल्पाचा अहवाल सादर करावा लागेल आणि कामाची छायाचित्रेही अ‍ॅप्लिकेशनमध्ये अपलोड करावी लागतील.मिश्रा म्हणाले की, सध्या ही माहिती विभागीय स्तरावर असेल, परंतु लवकरच सामान्य लोकही ती पाहू शकतील, अशी व्यवस्था केली जाईल. प्रोजेक्ट मॉनिटरिंग इन्फर्मेशन सीस्टिम अ‍ॅप्लिकेशनमध्ये प्रत्येक प्रकल्पावर अगदी जवळून देखरेख ठेवली जाण्यासाठी अधिकाºयांकडून १८० प्रकारच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. ज्या क्षेत्रात काम मागे पडत चालले असल्याचे दिसेल, ते अ‍ॅप्लिकेशनद्वारे चटकन कळेल. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे राज्यांतील वेगवेगळे अधिकारी एकाच व्यासपीठावर एकमेकांशी जोडले जातील. यात कोणी खोटी माहिती दिली गेल्यास, तो लगेचच पकडला जाईल.एका विदेशी कंपनीच्या सल्ल्यानुसार हे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. ते अँड्रॉइड व अ‍ॅपल अशा दोन्ही फोनवर काम करील. प्राधिकरणचे प्रत्यक्ष कामावरील व मुख्यालयातील अधिकाºयांसाठी ते उपलब्ध असेल. त्याला कोणत्याही प्रकल्पाच्या डॅशबोर्डवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार