शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बलात्का-यांना पोलीस स्टेशनमधून फरफटत आणून जिवंत जाळलं, पाच वर्षाच्या चिमुरडीवर केला होता बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:36 IST

बलात्कार आरोपी आणि त्याच्या सहका-याला जमावाने पोलीस ठाण्यातून फरफटत नेत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

गुवाहाटी - बलात्कार आरोपी आणि त्याच्या सहका-याला जमावाने पोलीस ठाण्यातून फरफटत नेत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुणाचलमधील लोहित जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जवळपास 800 लोकांनी तेझू पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली आणि आरोपींना खेचून बाहेर काढलं. यानंतर त्यांना बाजारात नेऊन सर्वांसमोर हत्या केली. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणाला अटक केलेली नाही.

एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जमाव पोलीस स्थानकाबाहेर जमा झाला होता. यावेळी जमाव बलात्काराचे आरोपी संजय सोबोर आणि जगदीश लोहार यांना आपल्याकडे सोपवण्याची मागणी करत होता. संजय सोबोर या आरोपीवर एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यात जगदीश लोहारने त्याला मदत केली होती. पोलिसांनी आरोपींना सोपवण्यास नकार दिल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर जमावाने पोलीस कर्मचा-यांना  न जुमानता लॉकअप तोडलं आणि दोन्ही आरोपींना फरफटत मार्केट परिसरात नेलं आणि हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह तिथेच टाकून जमावाने पळ काढला'. 

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. 'आम्ही घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही', अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. 

पाच वर्षाची मुलगी नामगो गावातून 12 फेब्रुवारीला बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तपास सुरु केला होता. 17 फेब्रुवारीला घरापासून 400 मीटर अंतरावर चिमुरडीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी तपासाची सुत्रं हलवत संजय सोबोर आणि जगदीश लोहारला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आपणच बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांनी कबूल केला होता. चहाच्या मळ्यात नेऊन आपण चिमुरडीवर बलात्कार केला होता. पण तिने रडण्यास सुरुवात केल्यानंतर आपण तिची हत्या करुन घटनास्थळावरुन पळ काढला असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा