शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Mob Lynching : राजस्थानमध्ये गो तस्करीच्या संशयावरून एकाची हत्या, दोन अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 13:14 IST

जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे.

अलवर (राजस्थान) - जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मृत व्यक्ती दोन गाई आपल्यासोबत घेऊन जात असताना काही लोकांनी तो गो तस्करी करत असल्याचा आरोप केला आणि मारहाण करून त्याची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव अकबर असल्याचे समोर आले आहे. तो हरयाणातील कोलागाव येथील रहिवासी होता.  दरम्यान या प्रकरणी दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड परिसरात असलेल्या लल्लावंडी गावात ही घटना घडली आहे. येथे शुक्रवारी रात्री एक व्यक्ती दोन गाई नेत असताना जमावाने तो गो तस्कर असल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्याची आलेली नाही. 

 अलवरचे एएसपी अनिल बेनिवाल यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, "मृत व्यक्ती गो तस्कर होता की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आम्ही त्यांना लवकरच बेड्या ठोकू." दरम्यान अलवरचे खासदार करण सिंह यादव यांनी या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याआधी 2017 साली अलवर जिल्ह्यातच गोतस्करीवरून पहलू खान याची हत्या झाली होती. जमावाने मारहाण करून त्याची हत्या केली होती. त्यावरून देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  

 

टॅग्स :Crimeगुन्हाRajasthanराजस्थानnewsबातम्या