मनसेच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
By Admin | Updated: May 18, 2014 00:19 IST2014-05-17T23:52:27+5:302014-05-18T00:19:34+5:30
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरास आजपासून प्रारंभ झाला़

मनसेच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरास आजपासून प्रारंभ झाला़
परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवाजीराव काळोगे व आमदार वसंत गिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले़ हे शिबिर ५ जूनपर्यंत चालणार आहे़ शिबिरासाठी एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ रविवारपासून सकाळी ६ ते ८ दरम्यान केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर शारीरिक प्रशिक्षण सराव होणार आहे़ दुपारी २ ते ५ या कालावधीत जुना आग्रा रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात लेखी परीक्षांचा सराव तसेच मार्गदर्शन होणार आहे़
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस भरतीप्रक्रिया, शारीरिक चाचण्या, त्यासाठीची तयारी, लेखी परीक्षा, विषयांचा अभ्यास यांसह विविध प्रकारची माहिती उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दिली़ यामध्ये शिवाजीराव काळोगे यांच्यासह तालुका क्रीडाधिकारी पल्लवी सानप, मविप्रचे परिष्ठ क्रीडाधिकारी हेमंत पाटील, कैलास लवांड, राम खैरनार, युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक डॉ़ जी़ आऱ पाटील, पद्माकर घुमरे आदिंनी मार्गदर्शन केले़
याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, मनपा गटनेता अशोक सातभाई, बाळासाहेब दुगजे, मुकेश शहाणे, सचिन चव्हाण, देवेंद्र वाटाणे, मयूर इघे, धनंजय कर्के, प्रदीप बोराडे, बबन बोडके आदि उपस्थित होते़
फ ोटो क्रमांक - 17 पीएचएपी116
फ ोटो ओळी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार वसंत गिते़