एमएमआरडीए प्रकल्पबाधित बेघर
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30
एमएमआरडीए प्रकल्पबाधित बेघर

एमएमआरडीए प्रकल्पबाधित बेघर
ए एमआरडीए प्रकल्पबाधित बेघरपुनर्वसन करण्याची मागणी : रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या मेट्रो-१ आणि मेट्रो ३ प्रकल्पातील शेकडो प्रकल्पबाधितांना अद्यापही हक्काचे घर मिळालेले नाही. या प्रकल्पबाधितांना गणेशोत्सवापुर्वी घराचा ताबा न दिल्यास मुंबई महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेल्वे झोपडपी पुनर्वसन समितीने दिला आहे.एमएमआरडीए प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी समितीने यापुर्वी भाजपा कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतरही मुख्यमंत्री प्रकल्पबाधितांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने अखेर समितीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मेट्रो १ साठी वसार्ेवा, घाटकोपर, भीमनगर येथील ३६१ झोपड्या तोडण्यात आल्या. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन नाहूर येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बेघर झोपडपीवासियांना ताबा पत्र देण्यात आले असले तरी गेल्या चार वर्षांपासून रहिवाशांना घरांचा ताबा दिला नसल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष चांगदेव वानखेडे यांनी केला आहे.मेट्रो ३ प्रकल्पासाठी अंधेरी पूर्व येथील सारिपुत नगर, सिप्झ, एमआयडीसी येथील झोपड्या तोडण्यात आल्या असून येथील झोपडपीवासियांनाही घरांचा ताबा देण्यात आला नसल्याचे, वानखेडे म्हणाले. प्रकल्पबाधितांना एमएमआरडीएने घराचा ताबा न दिल्यास मुंबईसह ठाण्यामध्ये आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.