शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ते' वादग्रस्त विधान भोवलं; भाजप आमदार टी राजा सिंह यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 15:40 IST

भाजप आमदार टी राजा सिंह यांच्यावर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

हैदराबाद:तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार टी राजा यांना पक्षाने निलंबित केले आहे, तसेच येत्या 10 दिवसात या प्रकरणावर उत्तर मागितले आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे हैदराबादमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटकही केली. पण, आता पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. 

टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये त्यांनी मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समुदायाने सोमवारी रात्री पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू केली. त्यांच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीवरही भाष्य केले आहे.

यापूर्वी अनेक वादात नाव

टी राजा सिंह यांनी यापूर्वी अनेकदा आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. या वर्षी जूनमध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. टी राजा सिंह यांच्याविरोधात हैदराबादचे रहिवासी मोहम्मद अली यांनी तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, टी राजा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये राजा सिंह अल्पसंख्याक समुदायाबद्दल अपमानास्पद बोलतांना दिसत होते. याप्रकरणी कांचनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

43 गुन्हे दाखल असल्याची माहिती

टी राजा सिंह यांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या विरोधात 43 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. त्यापैकी 16 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर द्वेश पसरवल्याप्रकरणी 17 तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणाMLAआमदार