शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 23:13 IST

तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला.

Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये सहा मुले, नऊ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे, असे तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तर ४० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तमिलगा वेट्टी कझगम प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी नमक्कल येथे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ही भीषण घटना घडली. 

तमिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख अभिनेता विजय यांच्या करूर येथे झालेल्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. अभिनेता-राजकारणी असलेल्या विजय यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि अने लोक बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. करूर द्रमुकचे आमदार आणि माजी मंत्री सेंथिल बालाजी यांनी धक्कादायक माहिती दिली..

"आतापर्यंत चेंगराचेंगरीत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना, एसपींना आणि मला रुग्णालयात जाण्याचे आदेश दिले. आम्हाला अतिरिक्त डॉक्टरांना बोलावून योग्य उपचार देण्याचा सल्ला दिला. उद्या, मुख्यमंत्री स्वतः येथे येणार आहेत. सध्या ४६ जण खाजगी रुग्णालयात आहेत आणि १२ जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत," अशी माहिती सेंथिल बालाजी यांनी दिली.

विजय सभेला संबोधित करत असताना, गर्दी अनियंत्रित झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि काही मुले यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांनी अलार्म वाजवला. विजयचे लक्ष जाताच त्यांने भाषण थांबवले आणि प्रचाराच्या बसमधून गर्दीला पाण्याच्या बाटल्या वाटण्याचा प्रयत्न केला. गर्दीच्या रस्त्यावरून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. बेशुद्ध झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत गेला.

या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक्स पोस्टवरुन यावर प्रतिक्रिया दिली. "करूर येथून मिळालेली माहिती चिंताजनक आहे. गर्दीत अडकलेल्या आणि बेशुद्ध पडलेल्या कोणालाही तात्काळ रुग्णालयात दाखल करावे आणि वैद्यकीय मदत करावी असे मी निर्देश दिले आहेत. मी या प्रकरणाबाबत माजी मंत्री सेंथिल बालाजी, मंत्री सुब्रमण्यम एम.ए. आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. याव्यतिरिक्त, शेजारच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे मंत्री अनबिल महेश यांना तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यासाठी मी एडीजीपीशीही बोललो आहे. मी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो," असं मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Stampede: 31 Dead at Actor Vijay's Rally

Web Summary : A stampede at actor Vijay's rally in Tamil Nadu's Karur killed 31 people, including children and women. Over 40 are injured. The rally, organized by Vijay's party, led to chaos and fatalities. Authorities are investigating, and the Chief Minister will visit.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूStampedeचेंगराचेंगरीAccidentअपघात