आपचे आमदार रितुराज गोविंद यांना अटक

By Admin | Updated: November 7, 2016 06:20 IST2016-11-07T06:20:06+5:302016-11-07T06:20:06+5:30

छठपुजेच्या दरम्यान दिल्लीच्या किराडी भागात शांतता भंग केल्याच्या आरोपावरुन आपचे आमदार रितुराज गोविंद यांना अटक करण्यात आली आहे.

MLA Rituraj Govind arrested | आपचे आमदार रितुराज गोविंद यांना अटक

आपचे आमदार रितुराज गोविंद यांना अटक

नवी दिल्ली : छठपुजेच्या दरम्यान दिल्लीच्या किराडी भागात शांतता भंग केल्याच्या आरोपावरुन आपचे आमदार रितुराज गोविंद यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आपचे हे १५ वे आमदार आहेत. या अटकेला दुजोरा देताना पोलीस उपायुक्त एम. एन. तिवारी यांनी सांगितले की, छठपुजेच्या दरम्यान शांतता भंग केल्याच्या आरोपात रितुराज यांना अटक करण्यात आली आहे. छटपुजेच्या पार्श्वभूमीवर येथे
कलम १४४ लागू करण्यात आले
होते. याचे या आमदारांकडून
उल्लंघन झाले. (वृत्तसंस्था)

Web Title: MLA Rituraj Govind arrested