शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Mizoram Assembly Election Results: मिझोरममध्ये स्थानिक पक्षांचाच पगडा भारी; काँग्रेस-भाजपची घसरली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:07 IST

मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर रोजी सुमारे ७७,०४ % मतदान झाले होते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे.

आईजोल - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी ४ राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर आज मिझोरममधील निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर, आता ईव्हीएम मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. येथील राज्यात स्थानिक पक्षांचं वर्चस्व निकालात जाणवत असून काँग्रेसला अपेक्षित यश मिळत नाही. तर, भाजपही विजयाच्या स्पर्धेत नाही. पहिल्या कलानुसार झोराम पीपल्स मूव्हमेंटने आघाडी घेतली असून  जागांवर त्यांचे उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत. तर, मिझो नॅशनल फ्रंटसोबत त्यांची अटीतटीची लढाई दिसून येते.

मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर रोजी सुमारे ७७,०४ % मतदान झाले होते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. भाजप येथे किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार झोराम पीपल्स मूव्हमेंटने २१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, मिझो नॅशनल फ्रंट ११ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसच्या ३ उमेदवारांनी आघाडी घेतली असून भाजपा चौथ्या स्थानावर जावे लागले. भाजपचे उमेदवार १ जागेवर आघाडीवर आहेत. 

मुख्यमंत्री झोरांगथामा यांच्या नेतृत्त्वात एमएनएफने यंदाची निवडणूक लढवली आहे. तर, झेडपीएम माजी आयपीएस लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. ते झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे प्रमुख आहेत. लालदुहोमा हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा प्रमुखही राहिले आहेत. सन १९८४ मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले. मात्र, वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. सलग २ टर्म सत्तेत राहिल्यानंतर काँग्रेसला २०१८ साली मिझोरममधील सत्ता गमवावी लागली होती. ईशान्य भारतातील काँग्रेसचा हा शेवटचा गड २०१८ साली हातून गेला. पण, यंदाच्या निवडणुकीत तोच गड परत मिळवण्यासाठी काँग्रेसने धडपड केली. तर, मणीपूर अशांततेवरुन लक्ष्य ठरलेल्या भाजपाने तिकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मिझोरममध्ये प्रचारासाठी जाण्याचे टाळले. 

२०१८ मध्ये कोणी किती जागा जिंकल्या

दरम्यान, गत निवडणुकीत काँगेसला ४० पैकी ५ जागा जिंकता आल्या. मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट २६ जागांसह बहुमत मिळवलं होतं. तर, झोराम पिपल्स मूव्हमेंटला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपनेही १ जागा जिंकली होती.  

टॅग्स :mizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३Mizo National Frontमिझो नॅशनल फ्रंटElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा