मिथुन चक्रवर्र्तींनी शब्द पाळला
By Admin | Updated: June 17, 2015 02:43 IST2015-06-17T02:43:39+5:302015-06-17T02:43:39+5:30
शारदा चिटफंडचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होण्यासाठी घेतलेले १.२ कोटी रु. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुपूर्द करून

मिथुन चक्रवर्र्तींनी शब्द पाळला
कोलकाता : शारदा चिटफंडचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होण्यासाठी घेतलेले १.२ कोटी रु. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुपूर्द करून ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी दिलेला शब्द पाळला.
ईडीच्या चौकशीदरम्यान हजारो लोकांची कोट्यवधीने फसवणूक करणाऱ्या शारदा चिटफंडकडून घेतलेले पैसे आपण आपल्या वाढदिवशी परत करू असे वचन तृणमूलचे राज्यसभा सदस्य असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी दिले होते. १६ जूनला त्यांचा वाढदिवस होता. मिथुनचे वकील व इतर प्रतिनिधी सकाळी ईडीच्या सॉल्ट लेक येथील कार्यालयात पोहोचले व त्यांनी अधिकाऱ्यांना डिमांड ड्राफ्ट दिला. (वृत्तसंस्था)