पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर आता भाजप नेते अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ममता या बंगाली हिंदू समाजासाठी धोका बनल्या आहेत, असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हणाले आहे. एवढेच नाही तर, बंगालमध्ये वक्फ कायदा लागू न करण्याच्या मुद्द्यावर बोलताना, ममता बॅनर्जी संविधानपेक्षा वरच्या आहेत का, त्यांना हा अधिकार कुणी दिला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पश्चिम बंगालमधील धार्मिक हिंसाचाराला ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत, असा आरोप करत मिथुन म्हणाले, “भाजप नव्हे, तर ममता बॅनर्जी याच धार्मिक तणाव पसरवत आहेत. त्याच समाजात तेढ निर्माण करत आहेत. बंगाली हिंदू आता बेघर झाले आहेत आणि मदत छावण्यांमध्ये खिचडी खात आहेत. त्यांची चूक काय?" मिथुन चक्रवर्ती इंडिया टुडेसोबत बोलत होते.
"ममता बॅनर्जी संविधानापेक्षा मोठ्या नाहीत" -ममता बॅनर्जी यांनी नुकतेच मुर्शिदाबादमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे म्हणत, यात बीएसएफ, केंद्रीय संस्था आणि भाजपचा हात आहे. त्यांनीच बांगलादेशातील लोकांची घुसखोरी होऊ दिली, असल्याचा आरोप केला होता. यावर, मिथुन यांनी ममतांचे हे विधान दिशाभूल करणारे असून त्या मुस्लीम समाजाला जाणूनबुजून भरकटवत आहेत. तसेच, "एक असा कायदा जो भारताच्या संसदेत पास झाला आहे. तो लागू न करण्याची शक्ती ममतांना कुणी दिली? त्या केवळ एक मुख्यमंत्री आहेत. त्या संविधानापेक्षा मोठ्या नाहीत."
यावेळी मिथुन यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. तसेच, आता बंगालमधील हिंदू समजा संघटित होत आहे. एवढेच नाही तर, ममता बॅनर्जी यांच्या हस्ते जगन्नाथ मंदिराच्या उद्घाटनावरूनही त्यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, "आता त्यांना काहीही वाचवू शकणार नाही. त्यांचा खेळ हिंदूंच्या लक्षात आला आहे."