शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसींना ट्रस्टमधून वगळणे चूक : उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 14:32 IST

राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आणण्याकडे पुढील वाटचाल होईल, अंस सांगितले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. 

नवी दिल्ली - राम मंदिर उभारणीसाठी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या सदस्य आणि अध्यक्षपदावरून भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आधी अध्यक्षपदावर नाराजी होती. आता सदस्यपदावरून भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी समाजातील एका व्यक्तीचा समावेश राम मंदिर ट्रस्टमध्ये करायला हवा होता. राम दिर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भारती यांनी म्हटले आहे.

कल्याणसिंह, विनय कटियार आणि आपल्यासह रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी नेत्यांनी केले आहे. परंतु, सरकारने राजकीय व्यक्तीला ट्रस्टमध्ये घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी राजकारणाबाहेरील एखाद्या ओबीसी व्यक्तीला ट्रस्टमध्ये स्थान द्यायला हवे होते, अशी इच्छा भारती यांनी व्यक्त केली.

सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले. परंतु, त्याचे नेतृत्व ओबीसीने केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आणण्याकडे पुढील वाटचाल होईल, अंस सांगितले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.