शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्डमध्ये चूक राहिली आहे? दुरुस्तीसाठी हे ऑनलाइन-ऑफलाइन पर्याय वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 12:12 IST

कधीकधी पॅन कार्डसाठी भरलेल्या अर्जात चूक राहून जाते किंवा अयोग्य माहिती भरली जाते. त्यामुळे पॅनकार्डवरही चुकीची माहिती येते.

मुंबई- आज रोजच्या कामांमध्ये, आयकर परतावा भरण्यासाठी किंवा अनेकवेळेस बँकेच्या व्यवहारांमध्ये, देवाणघेवाणींमध्ये आणि अगदी केवळ ओळख पटवण्यासाठीही पॅनकार्डची गरज लागते. त्यामुळे इतर अनेक ओळखपत्रांबरोबर पॅन कार्डचे महत्त्व तितकेच जास्त आहे. मात्र कधीकधी पॅन कार्डसाठी भरलेल्या अर्जात चूक राहून जाते किंवा अयोग्य माहिती भरली जाते. त्यामुळे पॅनकार्डवरही चुकीची माहिती येते. असे तुमच्याबाबतीत झाले असल्यास तुम्ही पुढील पर्यायांचा विचार करु शकता.ऑनलाइन बदलांसाठी- तुम्हाला पॅनकार्डावरील चूक सुधारण्याची संधी ऑनलाइनदेखिल उपलब्ध आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'अॅप्लिकेशन टाइप' यावर क्लिक करा. तेथे गेल्यावर एक यादी मिळेल (ड्रॉप डाऊन मेन्यू). त्यातील 'चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टींग पॅन कार्ड' या ओळीवर क्लिक करा.

  1.  तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला संबंधित माहितीचे पेज दिसेल. त्यात तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
  2.  दुरुस्तीच्या विनंतीसाठी तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल आणि त्याचा इ-मेलही तुम्हाला केला जाईल.
  3.  त्यानंतर 'सबमिट स्कॅन्ड इमेजेस थ्रू इ-साईन' यावर क्लिक करुन तुम्हाला पॅन कार्डातील कोणत्या मजकुरात दुरुस्ती हवी आहे ते लिहा आणि सुयोग्य माहिती द्या.
  4.   सर्व माहिती भरल्यावर पुन्हा एकदा माहिती तपासून घ्या.
  5.  त्यानंतर 'नेक्स्ट' बटणावर क्लिक करा. तेथे तुम्हाला तुमच्या वयाचा, रहिवासाचा व ओळखपत्राचा दाखला देणारी कागदपत्रे भरावी लागतील (अपलोड करा).
  6.  तुम्ही दिलेली माहिती व कागदपत्रांवरील माहिती एकच आहे हे एकदा तपासा.
  7.   माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर पेमेंट करण्यासाठी पर्याय निवडा. जर तुमचा पत्ता भारतात असेल तर तुम्हाला 110 रुपये द्यावे लागतील आणि भारताबाहेरचा पत्ता असेल तर 1,020 रुपये द्यावे लागतील.
  8.  तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डावरुन पैसे देऊ शकता. किंवा नेट बँकिंग अथवा डिमांड ड्राफ्टचाही पर्याय तुम्हाला उपलब्ध असेल. जर तुम्ही डीडीचा पर्याय निवडलात तर तो 'NSDL-PAN' या नावाने काढावा आणि तो 'मुंबई' येथे देय असावा. 

ऑफलाइन बदलांसाठी-

  •  संकेतस्थळावरुन पॅनकार्ड माहिती बदलासाठी अर्ज डाऊनलोड करुन घ्या, त्यातील सर्व रकान्यांमध्ये माहिती भरा.
  •  एकदा माहिती भरल्यावर जवळच्या 'एनएसडीएल' केंद्रात अर्ज भरा.

काही महत्त्वाच्या बाबी-

  1.  सर्व साक्षांकित कागदपत्रे एनएसडीएल केंद्रात ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 15 दिवसांमध्ये पोहोचली पाहिजेत.
  2.  पॅनकार्ड दुरुस्तीचा अर्ज हा मजकूरातील दुरुस्तीसह अतिरिक्त कार्ड परत करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे तुम्ही अर्जातील योग्य पर्याय निवडला आहे का हे तपासून पाहावे.
  3. माहिती देताना थोडा वेळ गेला तरी चालेल पण अर्ज योग्यप्रकारे तपासून घ्या. पुन्हा चूक होणे आणखी त्रासाचे ठरू शकते.
टॅग्स :IndiaभारतIncome Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय