शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मिशन 2024; NDA ने आखली रणनीती, खासदारांचे 10 गट पीएम मोदींसोबत बैठका घेणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 18:33 IST

NDA Meeting: 18 जुलै रोजी राजधानी दिल्लीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक झाली.

NDA Meeting: राष्ट्रीय राजकारणासाठी 18 जुलै महत्वाचा दिवस होता. एकीकडे बंगळुरुमध्ये विरोधकांची, तर राजधानी दिल्लीत सत्ताधाऱ्यांची बैठक झाली. भाजपच्या नेतृत्वातील NDA च्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. रिपोर्टनुसार, एनडीएतील खासदारांचे 10 वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गट पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेणार आहे. यामध्ये सर्व खासदार आपल्या क्षेत्राची माहिती पीएम मोदींना देतील.

प्रादेशिक बैठक25 जुलैपासून या बैठकांना सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये दररोज 2 वेगवेगळ्या प्रदेशांची बैठक होईल. पहिल्या दिवशी यूपी आणि ईशान्येची बैठक होणार आहे. ज्यामध्ये या दोन्ही प्रदेशातील खासदार उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक गटात 35 ते 40 खासदार असतील. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत एनडीएच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 25 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान या बैठका होणार आहेत.

खासदारांचा अभिप्राय घेतला जाईलसमन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या बैठकीत संजीव बल्यान आणि अजय भट्ट यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने सरचिटणीस तरुण चुग आणि सचिव ऋतुराज सिन्हा समन्वय करणार आहेत. खासदार त्यांच्या कामाचा अहवाल तयार करू शकतात. 

एनडीए पक्षांनी निवेदन जारी केलेभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) दिल्लीतील बैठकीनंतर एक निवेदन जारी केले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका लढवतील आणि 'प्रचंड बहुमताने' सलग तिसऱ्यांदा सत्तेवर परततील. एनडीएच्या मित्रपक्षांनी देशाच्या विकासाचे कौतुक करत मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा ठराव बैठकीत मंजूर केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक