शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता तरुण चीनच्या हद्दीत आढळले, परत आणण्याची प्रक्रिया सुरू - रिजिजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 19:12 IST

किरन रिजिजू यांनी सांगितले, की पीएलएने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केल्याचे वृत्त येताच भारतीय लष्कराने चिनी लष्कराशी संपर्क साधला होता.

नवी दिल्ली -अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता झालेले 5 भारतीय युवक चीनच्या हद्दीत अढळून आले आहेत. खुद्द पिपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) याची पुष्टी केली आहे. हे युवक गेल्या तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. आता या युवकांना भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेशचे खासदार किरन रिजिजू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. यासंदर्भात रिजिजू यांनी ट्विट केले आहे, की "चीनच्या पीएलएने भारतीय लष्कराकडून पाठविण्यात आलेल्या हॉटलाइन मेसेजला उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता झालेले युवक त्यांच्या बाजूला आढळून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या युवकांना आपल्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंदर्भात योग्यती कारवाई केली जात आहे.

किरन रिजिजू यांनी सांगितले, की पीएलएने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केल्याचे वृत्त येताच भारतीय लष्कराने चिनी लष्कराशी संपर्क साधला होता. या युवकांना परत भारतात आणण्यासंदर्भात बोलणी सुरू आहे. अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निनॉन्ग ईरिंग यांनी, चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने राज्यातील पाच लोकांचे अपहरण केल्याचा दावा केला होता. 

निनॉन्ग ईरिंग यांनी शनिवारी ट्विट केले होते, “अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण चीनच्या पीएलएने अपहरण केले आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. पीएलए आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीला चोख उत्तर दिले गेले पाहिजे.”

पूर्व अरुणाचल मतदारसंघातील खासदार तापीर गावो यांनीही एक ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये गावो म्हणाले होते, "चीनच्या पीएलएने अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरीमध्ये असलेल्या मॅकमोहन लईनजवळील, सारा7 भागातून 3 सप्टेंबरपासून पाच तागीन (Tagin) युकवांचे अपहरण केल्याची माहिती आहे. अशीच एक घटना मार्च महिन्यातही घडली होती. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पार्टीविरोधात स्टँड घेण्याची वेळ आली आहे. हे पाच तरुण तागिन समाजाचे होते.  

महत्त्वाच्या बातम्या -

"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारत