शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मिस वर्ल्ड ओपल सुचाता चुआंगश्री म्हणाली, पंतप्रधान मोदींना भेटून आभार मानायचे आहेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:47 IST

१०८ देशांच्या सुंदरींमध्ये ओपल सुचाता चुआंगश्री हिने मिस वर्ल्ड म्हणून मारली बाजी

हैदराबाद: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना भेटून आभार मानायचे आहेत, असे मिस वर्ल्ड ओपल सुचाता चुआंगश्री हिने म्हटले. हैदराबादेत १०८ देशांच्या सुंदरींमध्ये बाजी मारलेली मिस वर्ल्ड ओपल सुचाता चुआंगश्री हिने म्हटले की, मला पंतप्रधाननरेंद्र मोदींना भेटायचे आहे. आम्हा सर्वांना हा एवढा अद्भूत अनुभव घेण्याची संधी दिल्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. आता मला हा किताब मिळाल्यामुळे माझ्याकडे अन्य लोकांची स्वप्ने साकार करण्याची व प्रभावशाली बनवण्याची संधी मिळाली आहे. एक वर्षापर्यंत मी मिस वर्ल्ड संघटनेबरोबर मिळून हेच काम करू इच्छिते, असे ती म्हणाली.

भारत कायम लक्षात राहील

भारतात घालवलेला काळ मला कायम स्मरणात राहील. खरे तर ही जागाच मला सोडावी वाटत नाही. आम्ही इथे राहिलो. येथील लोक, येथील जेवण आणि प्रत्येक गोष्टच खूप चांगली आहे. मला येथे येऊन खूपच आनंदी वाटले. जीवनातील फारच अविस्मरणीय काळ आम्ही येथे घालवला आहे.

थायलंडला प्रथमच मिस वर्ल्ड

ओपलने म्हटले आहे की, थायलंडचे लोक ७२ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मिस वर्ल्डच्या किताबची प्रतीक्षा करीत आहेत. माझा अजूनही विश्वास बसत नाही, की माझ्या देशातून हा किताब जिंकण्याचा पहिला मान मला मिळाला आहे. मला फार अभिमान वाटतो आहे. केवळ माझाच नव्हे तर माझे लोक, माझ्या टीमचा अभिमान वाटतो. कारण त्यांच्यामुळेच हे झाले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूकता करायची आहे

ओपलने म्हटले आहे की, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करायची आहे. महिलांच्या आरोग्याबाबतही खूप काही करायचे आहे. मला संधी मिळाली, तर मी सर्वांनाच मदत करण्यासाठी तयार आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. लोक म्हणायचे, तू हे करू शकणार नाहीस... फार पूर्वी माझे राजदूत बनण्याचे स्वप्न होते. मी महिला असल्यामुळे मी हे करू शकणार नाही, असे लोक मला म्हणायचे. त्यांचे म्हणणे होते की, या क्षेत्रात महिलांनी काम करणे खूप अवघड होते. परंतु, मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. माझा स्वत:वर विश्वास होता. मी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय सखोल शिकले.

टॅग्स :Miss Worldविश्वसुंदरीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी