मिश्रा दिल्लीचे नवे कायदामंत्री?

By Admin | Updated: June 10, 2015 23:28 IST2015-06-10T23:28:49+5:302015-06-10T23:28:49+5:30

बोगस कायदा पदवी प्रमाणपत्रप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर कायदा मंत्रिपदाचा राजीनामा देणारे जितेंद्रसिंह तोमर यांच्या जागी दिल्लीचे नवे

Mishra is new Delhi Law Minister? | मिश्रा दिल्लीचे नवे कायदामंत्री?

मिश्रा दिल्लीचे नवे कायदामंत्री?

नवी दिल्ली : बोगस कायदा पदवी प्रमाणपत्रप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर कायदा मंत्रिपदाचा राजीनामा देणारे जितेंद्रसिंह तोमर यांच्या जागी दिल्लीचे नवे कायदामंत्री म्हणून राज्य जल बोर्डाचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
खुद्द मिश्रा यांनीच बुधवारी याबाबतचे संकेत दिले. माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली होती. यावेळी मला कायदामंत्रीपदी नियुक्त करण्याबाबत सांगण्यात आले, असे मिश्रा यांनी सांगितले. पहिल्यांदा आमदार बनलेले मिश्रा हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अतिशय विश्वासू सहकारी मानले जातात. ‘इंडिया अगेन्स्ड करप्शन’ आंदोलनापासून ते केजरीवालांसोबत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)


 

 

Web Title: Mishra is new Delhi Law Minister?