शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ढोंगी बाबांच्या यादीत रामदेव बाबांचं नाव नाही हे पाहून दुख: झालं - दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:44 IST

भोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देभोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा टोला अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहेयादीत आसाराम बापू, संत रामपाल आणि गुरमीत राम रहीमच्या नावाचा समावेश आहे

नवी दिल्ली, दि. 12 - भोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली. अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. 

यादीत आसाराम बापू, संत रामपाल आणि गुरमीत राम रहीमच्या नावाचा समावेश आहे. दिग्विजय सिंह यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'यादीत बाबा रामदेव यांचं नाव नाही हे पाहून आपण हताश झालो आहोत'. यावेळी दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव बनावट वस्तू विकून फसवणूक करत असल्याचाही आरोप केला आहे. 'खोट्याला खरं सांगून बाबा रामदेव वस्तू विकत आहे', असं दिग्विजय सिंह बोलले आहेत. 

यावेळी दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव यांचं नावही यादीत समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. अन्यथा तुम्हीही बाबा रामदेव यांच्याकडून मिळणा-या पैशांमुळे प्रभावित झाल्याचा निष्कर्ष निघेल असं दिग्विजय सिंह बोलले आहेत.

हे आहेत ढोंगी बाबा - - आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी- सुखबिंदर कौर उर्फ राधे मां- सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता- गुरमीत राम रहीम सिंह- ओमबाबा उर्फ विवेकानंद झा- निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह- रामपाल- आचार्य कुशमुनि- वृहस्पति गिरी- मलखान सिंह - इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी- स्वामी असीमानंद- ओम नमः शिवाय बाबा- नारायण साईं

संत उपाधी देण्याबाबतही निर्णय-यावेळी अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने  'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. याद्वारे  गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल.  विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.    सरकारला पाठवणार यादी-  या ढोंगी बाबांची यादी सरकारला पाठवणार असल्याची माहिती आहे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांविरोधात कारवाई केली जावी असा त्या मागचा उद्देश आहे.  दरम्यान या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरुन ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगत आहे. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहAll India n. R. Congressआॅल इंडिया एन. आर. काँग्रेस