लग्नासाठी विनयभंगाचा कट

By Admin | Updated: January 10, 2017 01:04 IST2017-01-10T01:04:07+5:302017-01-10T01:04:07+5:30

येथील नागवारा भागात ६ जानेवारी रोजी महिलेचा विनयभंग तिच्या मेहुण्याने घडवून

The misconduct cut for marriage | लग्नासाठी विनयभंगाचा कट

लग्नासाठी विनयभंगाचा कट

बंगळुरू : येथील नागवारा भागात ६ जानेवारी रोजी महिलेचा विनयभंग तिच्या मेहुण्याने घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले. इर्शाद खान हा सेल्स एक्झिक्युटिव्ह असून, त्याने दिलेल्या जबाबात माझे आणि माझ्या मेहुणीचे संबंध असून, तिच्याशी लग्न करायचे आहे, असे म्हटले आहे.
या लग्नाला आपली पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य परवानगी देणार नाहीत, हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने हा कट रचला. त्यामुळे तिच्या चारित्र्यावर डाग असल्याचा बोभाटा होईल व तिच्याशी मुलीशी कोणी लग्न करणार नाही. तिला नकार आला की, तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव मांडू, असे त्याने म्हटले. (वृत्तसंस्था)

इर्शादच्या या कटात ती महिलाही सहभागी होती आणि तिच्याविरोधात पुरावे गोळा केले जात आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व) हेमंत निंबाळकर म्हणाले की, विनयभंगाची गंभीर तक्रार महिलेने पोलिसांकडे केली असून, आम्ही चौकशी करीत आहोत.

Web Title: The misconduct cut for marriage