मिरी आठवडे बाजाराचा लिलाव
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
मिरी : मिरी ग्रामपंचायत आठवडे बाजाराचा लिलाव १ लाख ५३ हजार ३०० रुपयांना देण्यात आला. हा लिलाव गेल्यावर्षीपेक्षा ३६ हजार ५०० रुपये अधिक रकमेला गेला.

मिरी आठवडे बाजाराचा लिलाव
म री : मिरी ग्रामपंचायत आठवडे बाजाराचा लिलाव १ लाख ५३ हजार ३०० रुपयांना देण्यात आला. हा लिलाव गेल्यावर्षीपेक्षा ३६ हजार ५०० रुपये अधिक रकमेला गेला.सरपंच मीना मिरपगार यांच्या अध्यक्षतेखाली हा लिलाव झाला. या लिलावात साखरबाई नवल, पोपट भाऊसाहेब वेताळ, भागचंद सोपान गवळी यांनी भाग घेतला. त्यात भागचंद गवळी यांनी सर्वाधिक बोली लावून हा बाजार लिलाव घेतला.बाजारातील व्यावसायिकांकडून किती पैसे घ्यायचे, याबाबत ग्रामपंचायतने ठरवून दिले आहे. आताही त्याच दराने वसुली होणार असल्याचे ग्रामपंचयतने सांगितले.यावेळी उपसरपंच भुजंग गवळी, ग्रामपंचायत सदस्य राहुल गवळी, बंडोपंत झाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश पिरपगार, विनोद गवळी, सोमनाथ झाडे, संभाजी दारकुंडे आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांनी बाजार लिलावाच्या अटी, शर्ती वाचून दाखविल्या. त्यांना दिलीप गुंड, अशोक वेताळ, संभाजी घोपडे यांनी सहकार्य केले.वाढीव बाजार लिलावामुळे ग्रामपंचायतच्या उत्पन्नात भर पडून पुढील विकास कामे करणे ग्रामपंचायतला शक्य होईल, असे सरपंच मिरपगार यांनी यावेळी सांगितले.