अधिका-याने त्रिवेणी संगममध्येच केली लघुशंका
By Admin | Updated: February 23, 2016 18:15 IST2016-02-23T18:08:59+5:302016-02-23T18:15:13+5:30
अलाहाबादचे एडीएम ओपी श्रीवास्तव यांनी गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगममध्येच लघुशंका केली आहे

अधिका-याने त्रिवेणी संगममध्येच केली लघुशंका
>ऑनलाइन लोकमत -
उत्तरप्रदेश, दि. 23 - अलाहाबादचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) ओपी श्रीवास्तव यांनी गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगममध्येच लघुशंका केली आहे. हिंदूंचं पवित्रस्थान असणा-या त्रिवेणी संगममध्येच लघुशंका केल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ओपी शर्मा यांचा लघुशंका करतानाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
ओपी श्रीवास्तव आपल्या अधिका-यांसोबत त्रिवेणी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. ज्यावेळी अधिकारी तयारीबद्दल चर्चा करत होते तेव्हा ओपी श्रीवास्तव यांनी ओपी श्रीवास्तव यांनी चक्क त्रिवेणी संगममध्येच लघुशंका केली आहे.
याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा येथे संगम होतो म्हणून या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणले जाते.