शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, अमित शाहांच्या हत्येचं विधान भोवलं; प्रसिद्ध साहित्यिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 11:12 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित सभेत नरेंद्र मोदी आणि आमित शाह यांची हत्या करण्याची दिली चिथावणी.

चेन्नई -  नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना तामिळमधील प्रसिद्ध आणि काँग्रेस नेते नेल्लई कन्नन यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. अल्पसंख्याकांनी मोदी आणि अमित शाह यांची हत्या केली पाहिजे, असे विधान कन्नन यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित सभेत केले होते. दरम्यान, या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर नेल्लई कन्नन यांना अटक करण्यात आली आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी रविवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कन्नन म्हणाले होते की, ''अल्पसंख्याकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची हत्या केली पाहिजे. कुणीतरी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची हत्या करेल, असे मला वाटले होते. मात्र तसे कुणी केले नाही.'' सध्या गृहमंत्री अमित शाह ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नियंत्रित करत आहेत, असा आरोपही कन्नन यांनी केला होता. कन्नन यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच कन्नन यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपाने तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी कारवाई करत कन्नन यांना बुधवारी अटक केली. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 504, 505 आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 दरम्यान, ''काँग्रेस नेते नेल्लई कन्नन यांनी आपल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची हत्या करण्यासाठी मुस्लिमांन भडकवले आहे. यासंदर्भात मी तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे, असे भाजपा नेते एच. राजा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकTamilnaduतामिळनाडूcongressकाँग्रेस