शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"एकदा त्या मुलीला तर भेटायला अयोध्येत जा, जिच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्याने..."; आचार्य प्रमोद कृष्णम भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:13 IST

राहुल गाधी आणि अखिलेश यादन यांच्यावर भडकताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "धर्मनिरपेक्षतेच्या “योद्ध्यांनो” तुम्ही राम मंदिरात तर जाणार नाही, पण..."

काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम अयोध्येतील बलात्कार प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर भडकले आहेत. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत त्यांनी, अयोध्येतील एका 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे, किमान त्या पीडित मुलीला भेटण्यासाठी तरी अयोध्येत जा, असा सल्ला राहुल गांधी आणि अखिलेश यादन यांना दिला आहे.

"सेक्युलरिज्म मौन आहे, हा मोईन खान कोण आहे?" -राहुल गाधी आणि अखिलेश यादन यांच्यावर भडकताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "धर्मनिरपेक्षतेच्या “योद्ध्यांनो” तुम्ही राम मंदिरात तर जाणार नाही, पण तुमच्या पक्षाच्या नेत्याने सामूहिक बलात्कार केलेल्या 12 वर्षांच्या मुलीला भेटण्यासाठी तर एकदा अयोध्येला जा." प्रमोद कृष्णम यांनी आपली ही पोस्ट राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनाही टॅग केली आहे. आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी, "सेक्युलरिज्म “मौन” है, ये मोईन ख़ान “कौन” है?" असा प्रश्नही विचारला आहे.

सपा नेत्यावर बलात्काराचा आरोप -समाजवादी पक्षाचा नेता मोईन खानवर 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची पुष्टी केली. यानंतर पीडितेने आई-वडिलांना संपूर्ण प्रकरण सांगितले. अल्पवयीन मुलगी ही निषाद कुटुंबातील आहे. आरोपी सपा नेता एका बेकरीचा मालक आहे. बेकरीमध्ये नोकरीचे अमिष दाखवत त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

व्हिडिओ तयार करून... -आरोपीने पीडितेवरील बलात्काराचा व्हिडिओ तयार करून तिला, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तो तिच्यावर दोन महिने बलात्कार करत होता. ही घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक समाजवादी पक्षाचा भदरसा नगराध्यक्ष आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीSexual abuseलैंगिक शोषणAkhilesh Yadavअखिलेश यादव