हरियाणातील फरीदाबाद येथे सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. बल्लभगड शहर पोलिस स्टेशन हद्दीतील श्याम कॉलनी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी इतर मुलींसोबत घरी जात असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला. आरोपीने केलेल्या गोळीबारात मुलीच्या खांद्याला आणि पोटाला गोळी लागली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडिओमध्ये आरोपी हातात पिस्तूल घेऊन अल्पवयीन मुलीकडे धावत येत असल्याचे आणि त्यानंतर तिच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तत्काळ पळून गेला.पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आम्हाल या घटनेची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती आता स्थिर आहे. तिचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी लायब्ररीतून घरी परतत असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती आहे."
Web Summary : In Faridabad, Haryana, a 17-year-old girl was shot while returning from the library. The incident, captured on CCTV, shows the assailant firing at her before fleeing. The girl is hospitalized, and police are investigating.
Web Summary : हरियाणा के फरीदाबाद में लाइब्रेरी से लौट रही 17 वर्षीय लड़की को गोली मार दी गई। सीसीटीवी में कैद घटना में हमलावर भागने से पहले उस पर फायरिंग करता दिख रहा है। लड़की अस्पताल में है, पुलिस जांच कर रही है।