लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मु

By Admin | Updated: December 14, 2015 19:12 IST2015-12-14T19:12:06+5:302015-12-14T19:12:06+5:30

लीवर अत्याचार

Minor face showing marriage bait | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मु

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मु

वर अत्याचार

मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील एकलव्य नगरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोद एकनाथ माळी व त्याला प्रोत्साहन देणार्‍या त्याची आई झेलाबाई एकनाथ माळी व मित्र पिंटू काशिनाथ गायकवाड या तिघांविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. झोडगे येथे १९ नोव्हेंबर पूर्वी वेळोवेळी ही घटना घडली. पिडित मुलीने काल दुपारी ३ वाजता तालुका पोलीसात फिर्याद दिली. सदर मुलीवर आरोपी विनोद माळी याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याने ती सात महिन्याची गरोदर राहिली. गर्भपात केला नाही तर तुझ्याशी लग्न करणार नाही व जाळुन मारण्याची धमकी दिली. झेलाबाई व पिंटुने त्याला प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक खडांगळे करीत आहेत.

कापडाच्या गठाणींनी भरलेला ट्रक चोरीस; २८ लाखांचा माल लंपास

मालेगाव : शहरातील सरदारनगर बडा कब्रस्तानच्या भिंतीलगत कापडाच्या साठ गठाणींनी भरलेला उभा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. याप्रकरणी आझादनगर पोलीसात समीर खान बिस्मील्ला खान (४३) रा. सरदारनगर यांनी फिर्याद दिली. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने (ट्रक क्र. एम.एच.१६ ए.ई.९८७७) किंमत १४ लाख व ट्रकमधील साठ कापड्यांच्या गठाणी असा २८ लाख ४६ हजार ६५० रुपयांचा माल चोरुन नेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले करीत आहेत.

देवारपाडेत विषारी औषध सेवनाने इसमाचा मृत्यू

मालेगाव : तालुक्यातील देवारपाडे येथील सोपान धोंडू मोडुक (४८) याने विषारी औषध सेवन केल्याने त्याला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार सुरू असताना काल बुधवारी सकाळी साठेआठ वाजता मृत्यू झाला. पोलीस कर्मचारी अतुल पाटील यांनी तालुका पोलीसात खबर दिली. सोमवारी ७ डिसेंबर रोजी त्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास हवालदार बोगीर करीत आहेत.

Web Title: Minor face showing marriage bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.