शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, हत्या करुन मृतदेह फेकला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:42 IST

तीन नोव्हेंबरला या मुलाला गावातील जगदीश अहीरवार यांच्यासोबत  शेवटचे पाहण्यात आले होते.

भोपाळ - तेरावर्षीय अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात समोर आली आहे. मुलावर अत्याचार केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. मागच्या आठवडयात ही घटना घडली. चार नोव्हेंबरला मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. विदिशा जिल्ह्यातील कुरवाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. 

पोलीस निरिक्षक विरेंद्र सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. तीन नोव्हेंबरला या मुलाला गावातील जगदीश अहीरवार यांच्यासोबत  शेवटचे पाहण्यात आले होते. जगदीश अहीरवारची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर गळा आवळून मुलाची हत्या केली व मृतदेह नदीत फेकून दिल्याची जगदीशने कबुली दिली. 

जगदीशला पोलिसांनी अटक केली असून हत्येचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदवला आहे. वैद्यकीय अहवालाची प्रत मिळाल्यानंतर त्यातून अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचे स्पष्ट झाले. जगदीशला कलम 377 ही लावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तरुणीवर सामूहिक बलात्कार

मागच्या आठवडयात मध्य प्रदेशमध्ये 19 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जवळपास तीन तास तरुणीवर बलात्कार होत होता. बलात्कार करणा-या आरोपींनी चहा आणि सिगरेटसाठी ब्रेकही घेतला होता. यानंतर पुन्हा त्यांनी आपला अत्याचार सुरु ठेवला. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी ब्रिजखाली तरुणीवर बलात्कार होत असताना आजूबाजूने जाणा-या लोकांना आणि वाहनांना साधं हे दिसलंही नसावं याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीचे वडिल पोलीस उपनिरीक्षक आणि आई सीआयडीत असतानाही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. रेल्वे पोलिसांनी ही एक फिल्मी स्टोरी असल्याचा शेरा करत तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. जेव्हा पीडित तरुणीने स्वत: दोन आरोपींना पकडून पोलिसांसमोर हजर केलं, तेव्हा कुठे पोलिसांनी घटनेची दखल घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रार दाखल न करणा-या पोलिसाला निलंबित करण्यात आलं.

स्त्रियांसाठी सुरक्षित समजल्या जाणा-या भोपाळ शहरात झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे शहर हादरलं आहे. ज्या ठिकाणी बलात्कार झाला तिथला रस्ता नेहमी गजबजलेला असतो. तेथून 100 मीटर अंतरावर हबीबगंज रेल्वे स्थानक आहे. धक्कादायक म्हणजे आरपीएफ पोस्ट तर फक्त 50 मीटर अंतरावर होती. बलात्कार झाला तेथून 100 मीटर अंतरावर रस्त्यावरुन गाड्या धावत होत्या. मात्र एकालाही तरुणीवर बलात्कार होत असल्याची दखल घेणं महत्वाचं वाटलं नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा