शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 17:32 IST

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे.पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ६९ ए च्या अंतर्गत पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अ‍ॅप्सबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरील अनेक अ‍ॅप्सबद्दल सरकारकडे तक्रारी आल्या होत्या, असंही मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.चीनला चोख प्रत्युत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारलीयाआधी मोदी सरकारनं टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस टिकटॉक, हेलोसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पबजीसह लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रिडिंग, अ‍ॅपलॉक, कॅरम फ्रेंड्स यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलंगेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांत त्या तणावात आणखी भर पडली आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. पँगाँग सरोवराजवळ हा प्रकार घडला. यानंतर ३१ ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा चिनी सैन्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही भारतीय जवानांनी चिनी सैन्याला रोखलं. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव