शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 06:10 IST

ईडीचे झारखंडमध्ये छापे : बॅग, सुटकेस, पॉलिथिनमध्ये नोटा

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्करांची : लोकसभा निवडणुकीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी झारखंडची राजधानी रांची येथे पुन्हा एकदा छापे टाकून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईत काँग्रेस नेते व झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक (पीएस) संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून तब्बल ३० कोटी रुपये जप्त करण्यात आले. 

गेल्यावर्षी मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेले झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता बिरेंद्र राम यांच्याशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. मंत्री  आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक संजीव लाल यांच्या केवळ १५ हजार पगार असलेल्या नाेकराच्या  घरात नोटांची थप्पी पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावून गेले. नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याची यंत्रे मागविण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात जप्त करण्यात आलेल्या नोटा घरात कशा ठेवल्या होत्या, हे दिसते. 

रांचीत ज्या नऊ ठिकाणी ईडीने छापे टाकले, त्यात रस्ते बांधकाम विभागात कार्यरत सेल सिटीचे अभियंता विकास कुमार यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. याशिवाय, मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाचे सहायक जहांगीर आलम, मुन्ना सिंह आदींच्या ठिकाणांवर छापे पडले. रोखव्यतिरिक्त दागिनेही जप्त बॅग, सुटकेस व पॉलिथिनमध्ये नोटांची बंडले ठेवण्यात आली होती.  रोखव्यतिरिक्त दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

मंत्री काय म्हणाले?मंत्री आलमगीर आलम म्हणाले की, संजीव लाल हे सरकारी कर्मचारी आणि आमचे स्वीय सहायक आहेत. आम्ही स्वीय सहायकाची निवड अनुभवाच्या आधारे करतो. जे तुम्ही पाहात आहात, तेच आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहात आहोत. ईडी काय निष्कर्ष काढते ते पाहू. 

भाजपचा हल्लाबोलकाँग्रेस संपूर्ण देशाला लुटू इच्छिते. गरिबांना लुटून आपले खिसे भरणे हाच काँग्रेसचा उद्देश आहे. म्हणूनच राहुल गांधी म्हणतात, आम्ही घाबरणार नाही, असे भाजप नेते मजिंदर सिंह म्हणाले. ईडीने गेल्यावर्षी फेब्रुवारीत मुख्य अभियंता बीरेंद्र राम यांच्याशी संबंधित २४ ठिकाणांवर छापे टाकले होते.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड