खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 01:38 PM2021-02-09T13:38:39+5:302021-02-09T13:40:23+5:30

TMC MP Mahua Moitra’s remarks on former CJI : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा  यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

minister pralhad joshi says action will be taken on tmc mp mahua moitra the government serious on controversy remarks on ram temple | खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर

खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर

Next
ठळक मुद्देरंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली :  राम मंदिराचा निर्णय आणि तत्कालीन सरन्यायाधीश यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणे, ही गंभीर बाब आहे. याविषयी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या योग्य कारवाई करण्यासाठी विचार केला जात आहे, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सांगितले. (Bringing in ex-CJI and Ram Mandir is serious: BJP mulls action against TMC's Mahua Moitra for expunged remarks)

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा  यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. सोमवारी राष्‍ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्‍तावावर चर्चा करताना महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश यांच्या राम मंदिर निर्णयाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. याला भाजपा सदस्यांनी आणि सरकारकडून विरोध करण्यात आला. मात्र, यानंतरही महुआ मोइत्रा यांनी याचा पुनरुच्चार केला होता. 

रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटले होते. याचबरोबर, महुआ मोइत्रा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, अर्थव्यवस्थेची स्थिती, नवीन कृषी कायदे यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, न्यायव्यवस्था आता पवित्र नाही. याशिवाय, केंद्र सरकारने चुकीची माहिती आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी कुटीर उद्योग बनविला आहे. काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि असत्य याला धैर्य मानतात, असे म्हणत महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राम मंदिराचा निर्णय आणि तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महुआ मोइत्रा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आक्षेप घेत, अशा प्रकाराचा उल्लेख करता येणार नाही, असे सांगितले. तर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी नियमांचा हवाला देत, यावर आक्षेप नोंदविला. 

कोण आहेत महुआ मोइत्रा ?
प. बंगालच्या कृष्णानगरमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर महुआ मोइत्रा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी भाजपाच्या कल्याण चौबे यांचा सुमारे ६३ हजार मतांनी पराभव केला. महुआ मोइत्रा यांनी २००८ मध्ये राजकारण प्रवेश केला ते काँग्रेस पक्षातून. मात्र, लवकरच त्या काँग्रेसला कंटाळल्या आणि त्यांनी २०१० मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जींनी त्यांना २०१६ मध्ये करीमपूर विधानसभेचे तिकीट दिले आणि त्या विजयी झाल्या.

Web Title: minister pralhad joshi says action will be taken on tmc mp mahua moitra the government serious on controversy remarks on ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.