शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:02 IST

कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे.

कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे. विजयपुरा जिल्ह्याचे नाव बदलून १२व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर (बसवण्णा) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे, असे कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. यासोबतच त्यांनी कर्नाटक राज्याचे नाव बदलून 'बसवा नाडू' ठेवल्यास काहीही गैर होणार नाही असेही सांगितले. 

खरं तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अलीकडेच रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'बंगळुरू दक्षिण' करण्याचा प्रस्ताव मांडला होता. अशातच कर्नाटकचे अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी राज्याचेच नाव बदलण्याची मागणी केली आहे. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाविरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

विजयपुरा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणीएम बी पाटील यांनी सांगितले की, सर्वप्रथम या परिसराला विजयपुरा म्हणून ओळखले जात होते. नंतर आदिल शाही राजवटीत ते विजापूर झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ते विजयपुरा झाले. आता हा जिल्हा बसवेश्वर नावाने ओळखला जावा अशी मागणी अनेकांनी केली आहे. हे साहजिकच आहे कारण हा जिल्हा बसवण्णांची जन्मभूमी आहे आणि त्यात गैर काहीच नाही. खरं तर मंत्री पाटील हे विजयपुरा जिल्ह्यातील बाबलेश्वर विधानसभेचे आमदार आहेत.

"काही तांत्रिक अडचणी आहेत. विजापूरचे विजयपुरा झाले आणि बसवेश्वर झाले तर काही बाबींबाबत गैरसोय होईल. कारण अनेक ठिकाणी नाव बदलावे लागेल...अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांशी याबद्दल बोलेन आणि सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेऊ", असेही पाटील यांनी नमूद केले. खरं तर २०१४ मध्ये केंद्र सरकारने कर्नाटकच्या राजधानीसह राज्यातील १२ शहरांची नावे बदलण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर विजापूर हे विजयपुरा म्हणून ओळखले जाऊ लागले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण