शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

...अन् भाजपा मंत्र्याने घरीच घेतली कोरोना लस; यात काय चुकीचं आहे? म्हणत केला अजब खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 10:33 AM

BJP BC Patil And Corona Vaccine : बी. सी. पाटील यांनी देखील कोरोनावरील लस घेतली. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली - कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहेत. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर अनेक नेतेमंडळींनी देखील लस घेतली आहे. याचदरम्यान कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील (BC Patil) यांनी देखील कोरोनावरील लस घेतली. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांनी घरी कोरोना लस घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. घरी लस का घेतली याबाबत पाटील यांनी अजब खुलासा केला आहे. कोरोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी घरीच लस घेतली असं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत राहावं लागलं असतं. मात्र इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो आणि लसही घेऊ शकतो. यात चुकीचं काय आहे? असं पाटील यांनी म्हटलं आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. 

बी. सी. पाटील यांनी हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर या आपल्या गावातील घरी कोरोना लस घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रोटोकॉलनुसार अशी कुठलीही परवानगी नाही. राज्य सरकारला यासंबंधी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं राजेश भूषण यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र डोड्डामणी यांनी तालुक्याचे आरोग्य अधिकारी झेड. आर. मकंदर यांना नोटीस बजावली आहे.

फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण

 मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKarnatakकर्नाटकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी