शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'अध्यक्ष महोदय, मी दुखावला गेलोय; राहुल गांधींना शाळेत पाठवण्यात यावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:10 IST

लोकसभेत मंत्री गिरीराज सिंह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

नवी दिल्ली: मत्स्यपालनासाठी वेगळं मंत्रालय तयार करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींवर भारतीय जनता पक्षानं हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेत राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल यांना माहिती मिळावी, राहुल यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी राहुल यांना शाळेत पाठवण्याची गरज असल्याचा टोला सिंह यांनी लगावला. (BJP Minister Giriraj Singh slams Congress Leader Rahul Gandhi)राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही तर 'या' राज्याची इच्छा; सर्व्हेत मोदींना टाकलं मागेमत्स्यपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबद्दल लोकसभेत भाजपच्या खासदार सुनिता दुग्गल भाषण करत होत्या. या विषयावर बोलताना मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. 'राहुल यांनी २ फेब्रुवारीलाच लोकसभेत मत्स्यपालन विभागाबद्दल प्रश्न विचारला होता. पण काही दिवसांतच असा विभाग देशात असल्याचा त्यांना विसर पडला,' असं गिरीराज सिंह म्हणाले.राहुल गांधीच्या विधानावरून गिरीराज सिंह यांनी लोकसभेत जोरदार टोलेबाजी केली. 'राहुल गांधींच्या स्मरणशक्तीला काय झालंय मला समजत नाही. २ फेब्रुवारीला त्यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. पण पुद्दुचेरी आणि कोचीला गेल्यावर त्यांना याचा विसर पडला. मत्स्य पालन विभाग आधीपासूनच कार्यरत असल्याचं ते विसरले. आमचं सरकार आल्यावर यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू, असं राहुल गांधी म्हणाले. याबद्दल मला दु:ख वाटतं,' असं सिंह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा