श्रीनगरमध्ये काही मार्गावर धावल्या मिनी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:40 IST2019-11-12T04:40:09+5:302019-11-12T04:40:14+5:30

सोमवारी श्रीनगर शहरातील काही मार्गांवर मिनी बसेस धावल्या. द

Mini buses run on some routes in Srinagar | श्रीनगरमध्ये काही मार्गावर धावल्या मिनी बसेस

श्रीनगरमध्ये काही मार्गावर धावल्या मिनी बसेस

श्रीनगर : सोमवारी श्रीनगर शहरातील काही मार्गांवर मिनी बसेस धावल्या. दरम्यान श्रीनगर-बारामुल्ला मार्गावर दोनदा रेल्वे चालवून चाचणी घेण्यात आली. अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी ५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्यापासून बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातील रेल्वेसेवा मंगळवारपासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे.
श्रीनगर-बनिहाल मार्गाची सुरक्षेच्या दृष्टीने तपासण्यासाठी रेल्वे चालवून चाचणी घेतल्यानंतर काही दिवसांनी या मार्गावरील रेल्वेसेवा सुरूकेली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे मार्गाची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केल्यानंतर सोमवारी या मार्गावर रेल्वे चालविण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
चकमकीत दोन दहशतवादी ठार
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये सोमवारी सकाळी सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर एक दहशतवादी लवदारा येथे रविवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर सोमवारी सकाळी अन्य एक दहशतवादी ठार झाला. या भागात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दले शोधमोहिमेवर असताना चकमक उडाली.

Web Title: Mini buses run on some routes in Srinagar