मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.

Minded Jaywant Jnanayog system | मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.
मनुष्याने कोणतेही साधन करताना तत्पर असावे. परमतत्त्वापर्यंत जावयाचे असल्यास ज्ञान नावाच्या साधनामध्ये तत्पर असावे लागते. कारण अध्यात्मज्ञानाशिवाय परमात्मवस्तू प्राप्त होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
तरी परमात्मा ऐसे।
जे एक वस्तु असे।
ते जया दिसे। ज्ञानास्तव।।
हे ज्ञान प्राप्त करण्याकरिताही चार गोष्टींची गरज आहे. विवेक, वैराग्य, शमदमारीषट्कसंपत्ती व मुमुक्षुता. संत तुकाराम महाराज म्हणतात,
फलकर तो संसार।
येश सार भगवंत।।
असा जो विचार आहे त्यालाच विवेक असे म्हणतात. माणसाने काही गोष्टींचा कधीच विचार करू नये व काही गोष्टींचा नेहमी विचार करावा. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

मी कोण ऐसा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।
'मी'चा विचार करणे यालाच विवेक म्हणतात. प्रापंचिक भोगाविषयी जी त्यागबुद्धी निर्माण झालेली असते, तिला वैराग्य म्हणतात. तसेच इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आदी करून ज्या गोष्टी त्यांना शमदमारीषट्कसंपत्ती म्हणतात व अंत:करणात असलेली तीव्र जिज्ञासा तिला मुमुक्षुता म्हणतात. या चार गोष्टींमध्ये असलेली तत्परता म्हणजेच ज्ञानामार्गाची तत्परता होय.
अष्टांग योगाचाही विचार योगसूत्रामध्ये पतंजली मुनींनी मांडलेला आहेच. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी आठ अंगे आहेत. यामध्येही तत्पर असणे त्यासच योगामार्गातील तत्परता असे म्हटले जाते.
याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी, एक मैत्रेयी व दुसरी कात्यायनी. मुनींनी सर्व संपत्ती दोघींना देऊन अरण्यात निघाल्यावर कात्यायनीने त्या संपत्तीचा स्वीकार केला; परंतु मैत्रेयीने त्या संपत्तीचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर अरण्यात निघून गेली. यामध्ये कात्यायनीचे जे रूप ते भोगरूप, मैत्रेयीचे जे रूप ते त्यागरूप व याज्ञवल्क्यांचे जे रूप ते योगरूप होय. याचा अर्थ असा आहे की, ज्ञानप्राप्तीमध्ये येणार्‍या अनेक प्रतिबंधाचा त्याग करणे हीच खरी ज्ञानयोग व्यवस्थिती होय.

Web Title: Minded Jaywant Jnanayog system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.