शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

... तर आम्ही तुम्हालाही मुस्लिम करु; ओवेसींचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 15:02 IST

एमआयएमचे अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त वक्तव्य

हैदराबाद: आमचा गळा कापलात, तरीही आम्ही मुस्लिमच राहू. आम्ही तुम्हाला मुस्लिम करुन दाढी ठेवायला लावू, असं वादग्रस्त विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्नीन ओवेसी यांनी केलं आहे. हरयाणात काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम व्यक्तीची दाढी जबरदस्तीनं कापण्यात आली. या घटनेचा निषेध करताना ओवेसी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हरयाणामध्ये ज्यांनी हे (मुस्लिम व्यक्तीची जबरदस्तीनं दाढी कापली) कृत्य केलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही शेवटपर्यंत मुस्लिमच राहू. आमचा गळा कापलात, तरी आम्ही मुस्लिमच असू, असं ओवेसी म्हणाले. आम्ही तुम्हाला मुस्लिम करुन तुम्हाला दाढी ठेवायला भाग पाडू, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. गेल्या आठवड्यात गुरुवारी हरयाणाच्या गुरुग्राममध्ये तिघांनी एका मुस्लिम व्यक्तीला जबरदस्तीनं सलूनमध्ये नेऊन त्याला दाढी कापायला लावली होती. या प्रकरणात तिघांना गुरुग्रामच्या सेक्टर 37 मधून ताब्यात घेण्यात आलं. एकलक्ष, गौरव आणि नितीन अशी या तिघांची नावं आहेत. यातील एकलक्ष आणि गौरवला उत्तर प्रदेशमधून, तर नितीनला हरयाणातून अटक करण्यात आली. 1 जुलै रोजी गुरुग्रामच्या खांडसा मंडीमध्ये ही घटना घडली. तीन आरोपींनी सुरुवातीला पीडित व्यक्तीचा धार्मिक कारणावरुन अपमान केला. मात्र त्यानं याकडे दुर्लक्ष केलं. मात्र वारंवार अपमान केला जात असल्यानं पीडित व्यक्तीनं पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर तिघांनी पीडित व्यक्तीला जबरदस्तीनं सलूनमध्ये नेऊन त्याची दाढी कापली.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMuslimमुस्लीमHinduहिंदू