शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ; श्रीमंत मित्रांसाठी ५जीचा महाघोटाळा, AAP चा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:12 IST

‘पहिले या, पहिले मिळवा’ तत्त्वाचा पुरस्कार करीत देशाच्या पंधरा लाख कोटींवर घातलेला हा दरोडा सर्वांत मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला.

नवी दिल्ली : आपल्या श्रीमंत मित्रांना मदत करण्यासाठी संसदेत विधेयक पारित करून फाइव्ह-जी स्पेक्ट्रमचा महाघोटाळा करण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असल्याचा आरोप आज आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी केला.

‘पहिले या, पहिले मिळवा’ तत्त्वाचा पुरस्कार करीत देशाच्या पंधरा लाख कोटींवर घातलेला हा दरोडा सर्वांत मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला. देशाच्या संपत्तीवर  सरकारच्या मित्रांचा अधिकार आहे का, असा सवाल करीत सरकार देशासाठी नव्हेतर, त्यांच्या मित्रांसाठी सर्व काही करण्यास तयार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने यापूर्वीच काही मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ केली. त्यांच्या राजवटीत बेइमान आणि चोर लोकांना पक्षात सामील करून त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. देशापुढे सरकारच्या चेहऱ्याचा बुरखा फाटला आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यांना कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळतेयतिहार तुरुंगाचे प्रशासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कुख्यात गुन्हेगार आणि अतिरेक्यांपेक्षाही वाईट वागणूक देत आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पीएमओ आणि उपराज्यपालांचे कार्यालय नजर ठेवून त्यांचे मनोधैर्य खचविण्याचे काम करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार आपने केला. दरम्यान, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांची भेट घेतली.

डॉक्टरही उतरले रस्त्यावरतुरुंगात केजरीवाल यांना चुकीची वागणूक देण्याच्या विरोधात आयटीओ चौकात आंदोलन करणाऱ्या तीन आप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आप आमदार कुलदीप कुमार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.आंदोलकांमध्ये काही डॉक्टर होते, त्यांनी त्यांचे पांढरे कोट घातले होते. हातात फलक घेतलेल्या आंदोलकांनी केजरीवाल यांना इन्सुलीन देण्याची मागणी केली. ते दीनदयाल उपाध्याय मार्गाकडे येत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. 

सिसोदियांना दिलासा नाही, तुरुंगातच राहणारमद्य धोरण प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत आज ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा