लाखो कर्मचारी करीत आहेत ईपीएफ दाव्याची प्रतीक्षा

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

Millions of employees are waiting for the EPF claim | लाखो कर्मचारी करीत आहेत ईपीएफ दाव्याची प्रतीक्षा

लाखो कर्मचारी करीत आहेत ईपीएफ दाव्याची प्रतीक्षा

>महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा

नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यत ३ लाख ४६ हजारावर कर्मचाऱ्यांना त्यांचा ईपीएफचा पैसा मिळाला नव्हता. २०११-१२ मध्ये ५.८७, २०१२-१३ मध्ये २.७४ आणि २०१३-१४ मध्ये ईपीएफ दाव्यांची २.३२ लाख प्रकरणे प्रलंबित होती. कर्मचाऱ्यांनी ईपीएफचा दावा केल्यानंतर ३० दिवसात त्यांना त्यांचा पैसा परत मिळणे आवश्यक आहे. परंतु आपला विभाग किमान दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये अर्ज दिल्यानंतर केवळ १० दिवसात दावेदारास रक्कम देण्याच्या स्थितीत आहे,असा दावा दत्तात्रय यांनी केला. लोकसभेत खासदार चंद्रप्रकाश जोश्ी यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. ईपीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला.
ईपीएफच्या प्रतीक्षा यादीतील सर्वाधिक कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत. यावर्षी २८ फेब्रुवारीपर्यत महाराष्ट्रात ईपीएफच्या कार्यालयात ९७,६०४ कर्मचारी आपला पैसा परत मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. गेल्या वर्षी हा आकडा फक्त ६७,६५१ आणि २०१२-१३ मध्ये ४५,१३० होता. २०११-१२ च्या अखेरीस १,६७,३७६ कर्मचाऱ्यांचे दावे प्रलंबित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Millions of employees are waiting for the EPF claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.