शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्यावर लष्कराचा भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:18 IST

एसओपीमध्ये बदल : सहा महिन्यांत १७ युवक वाचले

अंतिपुरा (जम्मू-काश्मीर) :  जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीच्या वेळी अतिरेक्यांनी शरणागती पत्करावी, यावर लष्कर सध्या भर देत आहे. यासाठी भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेतील मानक संचालन प्रक्रियेत (एसओपी) बदल केले असून, या धोरणामुळे मागील सहा महिन्यांमध्ये १७ युवकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी निपटणाऱ्या व्हिक्टर फोर्सअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या (आरआर) चार शाखांना लष्कर दिनानिमित्त चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. ५० आरआर, ४४ आरआर, ४२ आरआर व ३४ आरआरने विविध दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे व मागील वर्षी सप्टेंबरपासून सात जणांचे शरणागती पत्करण्यासाठी मन वळविले आहे. भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय मागील वर्षी करण्यात आला होता. देशाच्या राजधानी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या हस्ते यासाठी सन्मानित करण्यात आले. या शाखा कुमाऊं, राजपूत, आसाम व जाट रेजिमेंटच्या जवानांना घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

याबाबत उपलब्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, गंभीर धोका न जुमानता लष्कराने अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणून त्यांना शस्त्रे टाकण्यास राजी केले. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये जाहिद नामक अतिरेकी त्याच्या वडिलांशी भावपूर्वक भेटताना दिसत आहे. माझ्या मुलाचा आज दुसरा जन्म झाला, असे त्याचे वडील म्हणतानाही दिसत आहेत. हिंसेचा मार्ग सोडण्याची संधी दिल्याबद्दल आत्मसमर्पण करणारे अतिरेकी भारतीय लष्कराचे आभार मानतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. चकमकीच्या वेळी शरणागती पत्करण्याबाबतच्या मोहिमेची देखरेख करणाऱ्या व्हिक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल राशीम बाली यांनी म्हटले आहे की, या मोहिमेमुळे स्थानिक लोकांत मोठ्या प्रमाणावर सद्भावना निर्माण झाली आहे. मुख्य प्रवाहात परतण्यासाठी अद्यापही दारे खुली आहेत, याचा विश्वास यामुळे वाढीस लागला आहे. मुख्य प्रवाहात परंतु इच्छिणाऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी आमचे प्राण धोक्यात गेले तरी चालतील. मात्र, याचबरोबर बंदुका हाती घेऊन दहशतवाद पसरवू इच्छिणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे.

कुठून आली ही कल्पना?चकमकीच्या वेळीच अतिरेक्यांचे मन वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कल्पना मागील वर्षी पुढे आली. अतिरेकी समूह अल बद्रचा अतिरेकी शोएब अहमद भट याने चकमक सुरू असताना शस्त्रे टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील प्रादेशिक सेनेच्या एका जवानाची हत्या करणाऱ्या समूहाचा एक भाग होता परंतु लष्कराने त्याच्या शरणागतीचा मार्ग मोकळा केला व त्याला चौकशीनंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून ही कल्पना पुढे आली व तिचा विस्तार करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी