शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पाकिस्तानच्या तुरुंगात सैन्यदलाचा अधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:35 AM

२३ वर्षे अटकेत; आईने घेतली सर्वोच न्यायालयात धाव 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एक सैन्य अधिकारी पाकिस्तानच्या जेलमध्ये मागील २३ वर्षांपासून अडकला असून, त्याला स्वदेशी परत आणण्यासाठी राजनैतिक माध्यमातून तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी करणाऱ्या त्याच्या आईच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी तयारी दर्शविली आहे.     सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने नोटीस जारी करून केंद्राकडून ८१ वर्षीय कमला भट्टाचार्या यांच्या याचिकेवर उत्तर मागविले आहे. या प्रकरणात तत्काळ मानवीय आधारावर अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. कमला या कॅप्टन संजीत भट्टाचार्या यांच्या मातोश्री आहेत. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, माझ्या माहितीनुसार संजीत हा लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये बंद आहे. त्याला ऑगस्ट १९९२ मध्ये भारतीय सेनेच्या गोरखा रायफल्स रेजिमेंटमध्ये एका अधिकाऱ्याच्या पदावर समाविष्ट करून घेण्यात आले होते.  संजीत हे गुजरातमधील कच्छच्या रणातील सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले होते, अशी माहिती कुटुंबीयांना एप्रिल १९९७ मध्ये देण्यात आली होती.

अधिवक्ता सौरभ मिश्रा यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, याचिकाकर्तीच्या मुलाला मागील २३ वर्षांत कोणत्याही प्रकारे त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही, तसेच त्याच्या कुटुंबीयांनाही बोलू देण्यात आले नाही.  एप्रिल २००४ मध्ये याचिकाकर्त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण मंत्रालयाकडून एक पत्र प्राप्त झाले. त्यात म्हटले होते की, संजीत यांना मृत मानले जात आहे. ३१ मे २०१० रोजी मिळालेल्या एका पत्रात म्हटले आहे की, संजीत यांचे नाव विद्यमान बेपत्ता युद्ध कैद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. कॅप्टन संजीत यांचे कुटुंबीय आजही त्यांच्या परतण्याची वाट पाहात आहेत. २८ नोव्हेंबर २०२० रोजी याचिकाकर्तीच्या पतीचे निधन झाले.  याचिकाकर्तीचे वय आज ८१ वर्षांचे आहे व त्या आपल्या मुलाला पाहण्यासाठी तळमळत आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे.२३ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरंगात अडकलेल्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या मुक्तता होण्यासाठी आता कोणता निर्णय उच्च न्यायायलाय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान