पाकच्या गोळीबारात लष्करी अधिकारी शहीद

By Admin | Updated: August 26, 2015 03:43 IST2015-08-26T03:43:23+5:302015-08-26T03:43:23+5:30

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक अधिकारी (जेसीओ) शहीद झाला.

Military officer martyr in Pakistan firing | पाकच्या गोळीबारात लष्करी अधिकारी शहीद

पाकच्या गोळीबारात लष्करी अधिकारी शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक अधिकारी (जेसीओ) शहीद झाला.
लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी घटनेची माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सोमवारी रात्री उशिरा आघाडीच्या चौक्यांवर गोळीबार केला. नौगाम सेक्टरमध्ये पाक लष्कराच्या एका नेमबाजाने लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
राहुल आज जम्मू-काश्मीरमध्ये
जम्मू : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मू-काश्मीरला येत असून यावेळी ते पाकिस्तानच्या गोळीबाराने पीडित भागातील लोकांच्या भेटीगाठी घेतील. याशिवाय राज्यातील पीडीपी-भाजप सरकारवर नाराज गटांसोबतही ते चर्चा करतील. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Military officer martyr in Pakistan firing