लष्कराने केरानमध्ये घुसखोरीचा कट उधळला, एक अतिरेकी ठार
By Admin | Updated: March 3, 2016 19:21 IST2016-03-03T19:18:55+5:302016-03-03T19:21:19+5:30
उत्तर काश्मीरमध्ये केरान सेक्टरमध्ये लष्कराने गुरुवारी घुसखोरीचा कट उधळून लावला.

लष्कराने केरानमध्ये घुसखोरीचा कट उधळला, एक अतिरेकी ठार
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ३ - उत्तर काश्मीरमध्ये केरान सेक्टरमध्ये लष्कराने गुरुवारी घुसखोरीचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला तर, दोन जवान जखमी झाले. केरान सेक्टरमध्ये रॉथंडा डोमरी येथून घुसखोरीचा प्रयत्न सुरु होता.
सीमारेषेजवळ हा भाग असून इथे अजूनही गोळीबार सुरु असल्याची माहिती लष्कराने दिली. नियंत्रण रेषेजवळ सशस्त्र दहशतवादी नजरेस पडताच जवानांनी तात्काळ कारवाई केली अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
जखमी झालेल्या दोन जवानांना उपचारासाठी घटनास्थळावरुन हलवण्यात आले असून, कारवाई अजूनही सुरु असल्याची प्रवक्त्याने माहिती दिली.