शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

'अन्न आणि औषधांशिवाय दहशतवाद्यांनी 30 तास दबा धरून बसणे आश्चर्यकारक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 09:22 IST

सैन्याला स्फोटकांचा किंवा जास्त क्षमतेच्या शस्त्रांचा वापर करता आला नाही.

श्रीनगर: करणनगर येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे खाण्याचे पदार्थ किंवा औषधं न सापडणं, ही आश्चर्याची बाब असल्याचे मत भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तब्बल 30 तास सुरू असलेल्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी इमारतीत लपलेल्या २ अतिरेक्यांना ठार केले. मात्र, इतका दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी ठाण मांडून बसायचे असेल तर दहशतवाद्यांकडे अन्नाचा साठा आणि औषधे असणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडील बॅग्समध्ये अशा कोणत्याही वस्तू सापडल्या नसल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही चकमक संपल्यानंतर भारतीय जवानांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांच्या मृतदेहांशेजारी दोन एके-47 रायफल्स आणि आठ काडतुसं मिळाली. मात्र, त्यांच्या बॅगेत कोणतेही खाण्याचे पदार्थ किंवा औषधे मिळाली नाहीत.या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण पाकिस्तानी असण्याची शक्यता आहे. मात्र, अन्य गोष्टींची अजूनपर्यंत पुष्टी होऊ शकलेली नाही. हे दोघेही लष्कर-ए-तोयबाचे हस्तक असल्याची माहिती सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक रविदीप साही यांनी दिली. दहशतवाद्यांकडे खाण्याचे पदार्थ किंवा औषधे न सापडणे ही थोडीशी विचित्र गोष्ट आहे. कारण, एखाद्या ठिकाणी बराच काळ ठाण मांडून बसायचे असेल तर दहशतवादी शक्यतो स्वत:जवळ खाण्याचे पदार्थ किंवा औषध बाळगतात. मात्र, असा प्रकार घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले. अतिरेक्यांनी श्रीनगरमध्ये सोमवारी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दलाने तो उधळल्यानंतर अतिरेकी जवळच्या इमारतीत लपले होते. सुरक्षा दल व अतिरेक्यांत मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. त्यात दोन्ही अतिरेकी मारले गेले. मात्र, हा नागरी वस्तीचा परिसर असल्यामुळे दहशतवाद्यांना मारण्यासाठी 30 तास लागले. दहशतवादी लपून बसलेल्या इमारतींना रहिवाशी इमारती खेटून असल्याने सैन्याला स्फोटकांचा किंवा जास्त क्षमतेच्या शस्त्रांचा वापर करता आला नाही.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानSunjuwan attackसुंजवा दहशतवादी हल्ला