जम्मू काश्मीरमध्ये सैन्य व दहशतवाद्यांमध्ये चकमक, १ जवान शहीद

By Admin | Updated: August 9, 2015 09:44 IST2015-08-09T09:44:00+5:302015-08-09T09:44:42+5:30

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच असून रविवारी सकाळपासून तंगधर सेक्टर येथे सैन्य व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

Militants and militants fired in Jammu Kashmir, 1 jawan martyr | जम्मू काश्मीरमध्ये सैन्य व दहशतवाद्यांमध्ये चकमक, १ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये सैन्य व दहशतवाद्यांमध्ये चकमक, १ जवान शहीद

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. ९ - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच असून रविवारी सकाळपासून तंगधर सेक्टर येथे सैन्य व दहशतवाद्यांमध्ये  चकमक सुरु आहे. या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. रविवारी कुपवाडा येथील तंगधर सेक्टर येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १ जवान शहीद झाला आहे. 

 

Web Title: Militants and militants fired in Jammu Kashmir, 1 jawan martyr