दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने उधळला, एका दहशतवाद्याचा खात्मा
By Admin | Updated: October 6, 2016 16:44 IST2016-10-06T16:44:13+5:302016-10-06T16:44:13+5:30
जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्याचा लष्कराच्या जवानांनी खात्मा केला आहे

दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने उधळला, एका दहशतवाद्याचा खात्मा
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्याचा लष्कराच्या जवानांनी खात्मा केला आहे. जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. सुरक्षा जवानांनी मात्र दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावला आणि एका दहशतवाद्याला ठार केलं. आज दिवसभरात लष्कराने एकूण घुसखोरीचे तीन प्रयत्न उधळले आहेत. नौगाम सेक्टरमध्ये दोन तर रामपूर सेक्टरमध्ये एक प्रयत्न झाला.
J&K: One terrorist killed during an infiltration bid in Naugam sector,body recovered during ongoing search operation.
— ANI (@ANI_news) October 6, 2016
दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट येथील ३० राष्ट्रीय रायफल्सच्या तळाजवळ अतिरेक्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन अतिरेकी ठार झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळ लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि औषधांचा साठा सापडला. एक-47, ग्रेनेड लाँचर्स, बंदुकीच्या गोळ्या, जीपीएस यंत्रणा, नकाशे आणि खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे. त्याच्याकडील सापडलेल्या औषधांच्या पाकिटांवर पाकिस्तानी निशाण (Made in Pakistan) आढळून आले आहेत, अशी माहिती कर्नल राजीव सिंग यांनी दिली आहे.