काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
By Admin | Updated: June 15, 2017 21:23 IST2017-06-15T21:20:07+5:302017-06-15T21:23:31+5:30
भारतीय लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य बनवण्यात येणा-या दहशतवाद्यांच्या धमकीनंतर दुस-याच दिवशी दहशतवादी हल्ला करण्यात आला

काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 15 - भारतीय लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य बनवण्यात येण्याच्या दहशतवाद्यांच्या धमकीनंतर दुस-याच दिवशी दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचा-याची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला आहे. सुरक्षा जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यात बुगंग गावातील पोलीस कर्मचारी स्वतःच्या घराबाहेर उभा होता. त्याच वेळी दहशतवाद्यांनी तिथे पोहोचून पोलीस कर्मचा-यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर धमकी देत दहशतवादी फरार झाले. जखमी पोलीस कर्मचा-याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शिनाख्त शब्बीर अहमद असं या पोलीस कर्मचा-याचं नाव आहे. या दिवसात तो सुट्टीवर होता. बुधवारी लष्करच्या स्थानिक कमांडरनं व्हिडीओ प्रसिद्ध करत पोलीस कर्मचा-यांना धमकी दिली होती. त्यानं पोलीस वर्दी सोडून दहशतवादी मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. तसेच पोलीस, जवान आणि अधिका-यांना आता लक्ष्य करण्यात येईल, असंही बजावलं होतं. दहशतवाद्यांना पैसे देणे आणि मुजाहिद्दीन, हुर्रियतला साथ देण्याच आवाहन केलं आहे. दहशतवादी संघटन हिजबुल मुजाहिद्दीननेही मंगळवारी दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत हिज्ब कमांडर सब्जार यांच्या हत्येचा बदला घेतल्याचं सांगितलं आहे.