मिकी पाशेको अधिवेशनास उपस्थित राहणार
By Admin | Updated: June 7, 2015 02:08 IST2015-06-07T02:08:05+5:302015-06-07T02:08:05+5:30
आमदार मिकी पाशेको तुरुंगात असले तरी, जुलैच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात ते उपस्थित राहू शकतील. सभापतींनी मान्यता दिल्यास

मिकी पाशेको अधिवेशनास उपस्थित राहणार
सद्गुरू पाटील , पणजी
आमदार मिकी पाशेको तुरुंगात असले तरी, जुलैच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात ते उपस्थित राहू शकतील. सभापतींनी मान्यता दिल्यास पाशेको यांना कामकाजात भाग घेता येईल. वीज अभियंता मारहाण प्रकरणी आमदार पाशेको हे सध्या सडा येथील तुरुंगात आहेत. त्यांना सहा महिन्यांची कैद झाली आहे. तथापि, अजूनही ते विधानसभेचे सदस्य असल्याने अधिवेशनास उपस्थित राहू शकतात, अशी माहिती मिळाली. याबाबत सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले, त्यांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांना अधिवेशनास येता येईल.