शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : दलाल क्रिश्चियन मिशेल वाजपेयी सरकारमध्येही होता सक्रीय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 10:55 IST

तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एनडीएच्या घटकपक्षातील समता पार्टीमधील अतिशय प्रभावशाली नेत्या जया जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्ली -  तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एनडीएच्या घटकपक्षातील समता पार्टीमधील अतिशय प्रभावशाली नेत्या जया जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे. अटल बिहार वाजपेयी पंतप्रधान असताना ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारासाठी लॉबिंग करणा-यांनी त्यावेळी मला संपर्क केला होता,असे दावा जया जेटली यांनी केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार,संरक्षण विभागातील करारांचा मध्यस्थी क्रिश्चियन मिशेलनं संपर्क केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

'मदत केल्यास त्या पैशांचा ढिगारा जमा करू शकतात', असे मिशेलनं एका भेटीदरम्यान म्हटल्याचा दावा त्यांनी केला आहे.  क्रिश्चियन मिशेल त्यावेळी चर्चेत आला जेव्हा तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात त्याचं उघड झाले होतं. जया जेटली यांच्या दाव्यानुसार त्यांना परदेशातून एक फोन आला होता. त्या व्यक्तीनं आपली ओळख क्रिश्चियन मिशेल अशी सांगितली. 

फोनवर झालेल्या बोलणीनंतर जया यांनी क्रिश्चियन मिशेलला दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे भेटण्यास तयारी दर्शवली. या दोघांची भेट 1999 सुरू झालेल्या कारगिल युद्धाच्या काही दिवसांपूर्वी झाला. समता पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस तेव्हा तत्कालीन वाजपेयी सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते.  'मिशेलनं यावेळी भारतात सक्रिय असलेल्या डिफेन्स डीलर्सबाबत माहिती दिली आणि अनेक प्रशासक खिशात असल्याचं सांगितले', असा दावादेखील जया जेटली यांनी केला. यानंतर मिशेलनं थेट पैसे कमावण्याची ऑफर समोर ठेवली, असा आरोपही जेटली यांनी केला आहे. दरम्यान मिशेलनं आपल्या हेतूबाबत उघडपणे काहीही सांगितले नाही, असेही त्यांनी सांगितले.

पैशांच्या ऑफरवर जया जेटलींनी मिशेलला सांगितले की,'आम्ही अशी कोणतीही गोष्ट करत नाही'. यावर, 'तुम्ही आपला पक्ष कसा चालवणार?', असा प्रश्न त्यानं जेटलींना विचारला. यानंतर जेटलींनी मिशेलसोबत भेट तातडीनं आटोपती घेतली आणि त्यादिवशी संध्याकाळी जॉर्ज फर्नांडिस यांना घडलेला प्रकार सांगितला.  यावर, मिशेलसोबत झालेल्या भेटीचा संपूर्ण तपशील संरक्षण विभागाला लेखी स्वरुपात द्यावा, असा सल्ला यावेळी फर्नांडिस यांनी दिल्याचाही जया जेटली यांनी सांगितले. दुस-या तसा तपशील त्यांनी लिहून दिला. यानंतर मिशेलनं जवळपास त्यांना 6-7 वेळा फोन केला. मात्र त्याला भेटण्यास किंवा कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यास नकार दिल्याचं जया जेटलींनी सांगितले. यानंतर ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात त्याचे नाव समोर आल्याचे समजल्याचे जेटलींनी सांगितले.  

टॅग्स :Agusta Westland Scamऑगस्टा वेस्टलँड घोटाळा